
पंढरपूर (प्रतिनिधी)
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी, राज्यातील पहिली उमेदवारी घोषित केली होती. पंढरपूर मतदार संघातून मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा या घोषणेत समावेश होता. मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सोमवारी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. यावेळी त्यांच्यासमवेत काही प्रमुख मंडळी उपस्थित होती.
मनसे नेते दिलीप धोत्रे हे जरी राज्यभरात मनसेचे काम करीत असले, तरीही ते पंढरपूर मतदार संघाचे रहिवासी आहेत. पंढरपूर मतदारसंघात त्यांचे कामही मोठे आहे. यामुळेच राज ठाकरे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता , त्यांनी पंढरपूर मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती.
अगदी त्याच दिवसापासून दिलीप धोत्रे यांनी मतदारसंघात दौरे सुरू केले, अख्खा मतदारसंघ
पिंजून काढला. सोमवार दि.२८ ऑक्टोबर रोजी त्यांनी महापुरुष आणि देवी देवतांचा आशीर्वाद घेऊन, उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत सौ. माधुरी धोत्रे ,बाबा चव्हाण आणि मनसेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात, त्यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी पंढरीतील श्री विठ्ठल रुक्मिणी , मंगळवेढ्यातील संत दामाजी ,संत चोखामेळा हुन्नूर येथील बिरोबा, हुलजंती येथील महालिंगराया , तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह इतर महापुरुषांच्या पुतळ्यांचेही दर्शन घेतले. यामुळे नागरिकांना स्व. आ. भारत भालके यांच्या उमेदवारी अर्ज भरल्या वेळीचे क्षण आठवले.