क्राइम
मुंबईत नीटच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करून, पळालेल्या क्लास मालकाला अटक
कर्नाटक पोलिसांनी पकडले

मुंबई:
साकीनाका येथे नीट विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्र सुरू करून, एक महिन्यात बंद करून फरार झालेल्या मालकाला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आदित्य देशमुखचा अखेर शोध लागला आहे. त्याचं खरं नाव औरगंडा अरविंद कुमार असून तो मूळचा हैदराबादचा राहणारा आहे. त्याला सध्या कर्नाटक पोलिसांनी अटक केली असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
साकीनाका येथे नीट विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आलं होतं. मात्र, अवघ्या एका महिन्यातच ते केंद्र बंद करुन, क्लासच्या मालकानं पोबारा केला होता. अखेर त्या क्लास मालकाचा पोलिसांना शोध लागला आहे. त्याचं खरं नाव औरंगडा अरविंद कुमार आहे. तो मूळचा हैदराबादचा राहणारा आहे. त्याला सध्या कर्नाटक पोलिसांनी अटक केली असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.