राजू खरेंच्या उमेदवारीने मोहोळ तालुक्यातील नागरिकांची भूमिपुत्राची मागणी पूर्ण केली
मोहोळ तालुक्यातील नेते उमेश पाटील यांची प्रतिक्रिया

पंढरपूर (प्रतिनिधी)
मोहोळ तालुक्याचा उमेदवार भूमिपुत्र असावा, अशी मागणी येथील मतदारांकडून होत होती.
यामुळेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसने ही मागणी पूर्ण केली आहे. यामुळेच
उमेदवारीत अदलाबदल झाली असल्याचे मत,
मोहोळ तालुक्याचे नेते उमेश पाटील यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसकडून उमेदवारीबाबत मोठी दक्षता घेण्यात आली आहे. मोहोळ तालुक्यात अनेक वर्षांपासून भूमीपुत्र आमदार नव्हता, याची सल येथील नागरिकांच्या मनात होती. येथील नागरिकांकडून तशी मागणीही होत होती. अचानक राजू खरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे ठोठावले ,आणि मग त्यांच्या नावाचा विचार करण्यात आला. राजू खरे हे भूमिपुत्र आहेत. राष्ट्रवादीने दिलेला हा उमेदवार मोठा चमत्कार घडवणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मोहोळ तालुक्याचे नेते उमेश पाटील यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. पाडव्याच्या शुभेच्छा देऊन, मोहोळ मतदारसंघातील निवडणुकीबाबत चर्चा केली. राष्ट्रवादीचा हा उमेदवार निवडून आणण्याची प्रतिज्ञा केली. यानंतरच राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार असल्याचे पवार यांना सांगितले.
मोहोळ तालुक्यात राजकीय धग वाढू लागली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार राजू खरे यांच्या उमेदवारीमुळे वातावरण आणखीनच तापले आहे.
राजू खरे हे स्थानिक उमेदवार असल्यामुळे, याचा फटका विरोधी उमेदवारास बसणार आहे.