
पंढरपूर (प्रतिनिधी)
माढा विधानसभा निवडणुकीत जरी उमेदवार रिंगणात असले तरीही तिरंगी सामना रंगणार असल्याचे चित्र आहे. अभिजीत धनंजय पाटील (महाविकास आघाडी), रणजीतसिंह बबनराव शिंदे (अपक्ष) आणि मीनल साठे (महायुती) या तीन उमेदवारांमध्ये निवडणूक रंगणार असल्याचे चित्र आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी
आ. बबनदादा शिंदे यांच्यासह १३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत.
मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक शिवाजीराव कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत,
रणजीतसिंह शिंदे यांना पाठिंबा दर्शविला आहे. माढा तालुक्यात घडलेल्या या घडामोडीमुळे, निवडणुकीत सांगलीच रंगत येणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
माढा विधानसभा मतदारसंघात आता आ. बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजीतसिंह शिंदे, अभिजीत धनंजय पाटील, मीनल साठे यांच्यासह
अभिजीत धनवंत पाटील (बहुजन समाज पार्टी), राहुल गौतम चव्हाण (वंचित बहुजन आघाडी), राजेश तानाजी खरे, तुकाराम बळीराम राऊत, अभिजीत अण्णासाहेब पाटील, अभिजीत तुळशीराम पाटील, महेश बाळू बिस्कुटे, मयूर आजिनाथ काळे सिताराम विठ्ठल रणदिवे, रणजीत मारुती शिंदे हे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.