
देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वार्धक्यामुळे त्यांना प्रकृतीच्या काही तक्रारी जाणवू लागल्या, आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एम्स रुग्णालयातील डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांना ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे.
लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रकृतीबाबत हॉस्पिटलमधून ताजी माहिती समोर आली नाही. भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारत सरकारने देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच भारतरत्न प्रदान केला होता.
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन, भारतरत्न देऊन सन्मानित केले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू उपस्थित होते. प्रकृती खालावल्याने त्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले होते.