
पंढरपूर (प्रतिनिधी)
विधानसभेच्या निवडणुका होऊन दहा दिवस उलटले तरीही भाजपा नेता निवडून शकली नाही. लोकशाही प्रथेप्रमाणे निकालानंतर बहुमंतवाला पक्ष नेत्याची निवड करतो, त्यानंतर हा नेता राज्यपालांची भेट घेऊन बहुमताचा पुरावा देतो. त्या अनुषंगाने राज्यपाल सरकार स्थापन करण्यासाठी बहुमतवाल्या पक्षाच्या या नेत्यास आमंत्रित करतात , आणि शपथविधी होतो. परंतु राज्यपालां ऐवजीं भाजपानेच शपथविधीचा सोहळा जाहीर केला आहे. भाजपाचा हा कारभार म्हणजे हॉल बुक केला आणि आता वधूवरचा शोध घ्यायचा आहे , अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केली आहे.
भाजपाच्या सध्याच्या राजकीय वर्तनावर अनंत गाडगीळ यांनी ,, प्रसिद्धी पत्रक काढून टीकेची झोड उठवली आहे. मागील आठ दिवसात भाजपाचे वर्तन लोकशाहीस लाजवणारे आहे. निवडणुकीनंतरची प्रथा तर सोडाच पण ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच , भाजपाचे अध्यक्ष शपथविधीची तारीख जाहीर करतात. यातून एकाधिकारशाही, संविधानाची पायमल्ली, लोकशाही प्रथांचे विसर्जन याचेच प्रतिबिंब दिसून येते. ही देशाच्या आणि लोकशाहीच्या दृष्टीने धोकादायक बाब आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास, भाजपाचा गेल्या दहा दिवसातील कारभार म्हणजे हॉल बुक केला आणि वधू वरचा शोध सुरू आहे. जावई निवडीपूर्वीच रुसला आहे अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते मा. आमदार अनंत गडगीळ यांनी केली आहे. भाजपाच्या सध्याच्या राजकीय वर्तनावर प्रसिद्धी पत्रक काढून टीकेची झोड उठवली आहे.