
पंढरपूर (प्रतिनिधी)
सोलापूर जिल्हा जनसेवा संघटनेची पंढरपूर तालुक्यात मकर संक्रातीपासून घोडदौड सुरू होणार असून , या संघटनेचे सदस्य नोंदणी अभियान सुरू होणार असल्याची माहिती ,या संघटनेच्या अनुसूचित जाती जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटोळे यांच्याकडून देण्यात आली आहे. मकर संक्राती दिवशीपासून या अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
जनसेवा संघटनेची स्थापना माजी सहकार राज्यमंत्री कै. प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी केली होती. यापुढील काळात या संघटनेने जिल्ह्यात मोठा नवलौकिक मिळवला होता. कै. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या निधनानंतर या संघटनेची धुरा डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या खांद्यावर आली. मध्यंतरीच्या काळात काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांमध्ये प्रवेश केल्यामुळे , या संघटनेच प्राबल्य कमी जाणवत होते. आता डॉ. धावलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. साहजिकच जिल्ह्यातील जनसेवा संघटनेचे
पदाधिकारीही काँग्रेसमधून बाहेर पडले आहेत.
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांपूर्वीच पार पडल्या आहेत. आता नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जनसेवा संघटनेचे संघटन मजबूत करून , या निवडणुकांना सामोरे जाण्याचा जनसेवा संघटनेचा प्रयत्न असणार आहे. याच पार्श्वभूमीवर डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुक्यात जनसेवा संघटनेचे जाळे वाढविण्याची तयारी, जिल्हाध्यक्ष अशोक पाटोळे यांनी बोलून दाखवली आहे.
तालुक्यातील जि. प. गट पंचायत समिती गणात दौरे काढण्यात येणार असून , जनसेवा संघटनेच्या सदस्य नोंदणीस चालना दिली जाणार आहे. पंढरपूर तालुक्यातील अधिकाधिक नागरिकांनी जनसेवा या सामाजिक संघटनेत सामील व्हावे , अशी विनंती अनुसूचित जाती जमाती विभागाचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटोळे यांच्याकडून करण्यात आली आहे.