
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर शहरात समाजसेवक संजयबाबा ननवरे यांचा करिष्मा वरचेवर वाढतच असून,
पंढरपूर शहरातील पायाभूत सुविधांमध्ये त्यांच्यामुळे मोठा फरक पडत आहे. त्यांच्या या कामामुळे शहरातील नागरिक मोठे खुश आहेत.
सुरुवातीला नागरिकांच्या मदतीला धावण्यापर्यंत त्यांची ख्याती होती. परंतु यानंतर त्यांनी सामाजिक कार्यक्रमात भाग घेणे सुरू केले. आणि बघता बघता असंख्य कामे त्यांच्या हातून घडून गेली.
मागील काही वर्षाच्या काळात संजय ननवरे हे नाव मदत कार्यासाठी पुढे होते. समाजातील गरजूंना आर्थिक मदत करण्यात त्यांचा हातखंडा होता.
परंतु पुढे जाऊन त्यांनी समाजकार्यात उडी घेतली. नागरिकांनी त्यांच्या कानात सांगावे, आणि त्यांनी प्रशासनाला धारेवर धरावे. एका पाठोपाठ एक अशी झपाझप कामे मार्गी लागत गेली. अल्पावधीतच ते समाजसेवक म्हणून पुढे आले.