पंढरीतील कमलीवाले आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित
अहमदनगरच्या युवा न्यूज मीडियाकडून गौरव

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर येथील समाजसेवक मुजम्मील कमलीवाले हे नेहमीच जातपात धर्माच्या पलीकडे जाऊन समाजसेवा करत असतात. कोव्हीड काळात ही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. वाढदिवसाला अनावश्यक खर्च करण्याचे टाळुन तोच खर्च, ते चांगल्या कामासाठी वापरतात. कोरोना काळात कोरोना योध्दा या पुरस्काराने त्यांना विविध संघटनांकडुन पुरस्कार मिळालेले आहेत. आत्तापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त असलेल्या समाजसेवकाची युवा क्रांती न्युज मिडीया महाराष्ट्र राज्यनेही दखल घेतली.
पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये आपल्या समाजकार्याचा ठसा उमटवणारे समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांचे मोठे कार्य असुन नेहमीच चर्चेत असतात. ते अनाथ गरजु गरिबांसाठी मदत करताना दिसुन येतात. त्यांच्या या कार्याची दखल अहमदनगर युवा क्रांती न्युज मिडीया महाराष्ट्र राज्यने घेतली आहे. समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना या ठिकाणी गौरवण्यात आले. हा कार्यक्रम अहमदनगर येथील मार्कडे संकुलमध्ये पार पाडला. अहमदनगरचे प्रथम नागरिक महापौर भगवान फुलसौंदर, सिनेअभीनेत्री- आस्था वांढरे सिनेअभीनेता-सागर निकम ( झी टिव्ही सोनी मराठी जीवा शिवा मुवी फेम) यांच्या हस्ते समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना आदर्श समाजसेवक २०२४ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा मानपत्र, गौरवचिन्ह, सन्मानचिन्ह, शाल देऊन गौरव करण्यात आला.