
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील उमेदवार दिलीप धोत्रे यांनी पंढरीतील देवदासी आणि तृतीयपंथीयांना दिलासा देण्याचे काम केले आहे. नवरात्र महोत्सवानिमित्त पंढरीत देवदासी आणि तृतीयपंथीयांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात त्यांना फराळ आणि साडी चोळीचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी मनसे नेते दिलीप धोत्रे, नाना कदम,
सौ. माधुरी धोत्रे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
कोरोना काळापासूनच पंढरी वासियांना दिलीप धोत्रे यांनी मदतीचा हात दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
यामुळे त्यांनी मतदार संघात गाव भेट दौरे सुरू केले आहेत. याचवेळी येथील गाडगे बाबा मठात
बुधवारी देवदासी आणि तृतीय पंथीयांना मदतीचा हात देण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात त्यांना भारी साड्यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना दिलीप धोत्रे यांनी देवदासी आणि तृतीयपंथी बांधवांसाठी आपण सरकारकडे नवीन महामंडळाची नेमणूक करावी, अशी मागणी करणार असल्याचे सांगितले. समाजातील विविध घटकांना आर्थिक उन्नती साधण्यासाठी , वेगवेगळ्या महामंडळांच्या मार्फत आर्थिक मदत दिली जाते, परंतु देवदासी आणि तृतीयपंथीयांसाठी कोणतीही मदत दिली जात नसल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.
*यापुढेही मदत करत राहणार*
कोरोना काळात पंढरीतील अपेक्षित आणि गरीब बांधवांना दिलीप धोत्रे यांनी मोठी मदत केली होती. समाजसेवा करण्याची वृत्ती अंगी असल्यामुळे, ते कायमच सर्वांच्या पुढे असतात. निवडणूक लढवणार असणार म्हणून नाही तर, यापुढेही आपण सर्वांना मदतीचा हात देऊ , असा विचार त्यांनी बोलून दाखवला.