सरकोली सोसायटीचा कर्जपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश जिल्हा बँकेस द्यावेत
चेअरमन हनुमंत भोसले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पंढरपूर (प्रतिनिधी)
सरकोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सभासदांना सुरळीत कर्जपुरवठा करण्यात यावा, असे आदेश जिल्हा मध्यवर्ती बँकेस द्यावेत, अशी विनंती सोसायटीच्या वतीने
चेअरमन हनुमंत भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. पंढरपूर तालुक्यातील सरकोली सोसायटी किती विचित्र अवस्थेत आहे, याचे चित्र यामुळे समोर आले आहे.
पंढरपूर तालुक्यातील सरकोली सोसायटीचे कर्जवाटप गेल्या तीन वर्षापासून बंद आहे.
या सोसायटीच्या एकूण १०२३ सभासादांपैकी २७ सभासंदांचे ९६ लाख रुपये कर्ज थकीत आहे.
यामुळे इतर १००० सभासद कर्जापासून वंचित राहत आहेत.
हा कर्जपुरवठा सुरळीत करण्यासाठी भोसले यांनी जिल्हा बँकेस मार्गही सुचवला आहे. सोसायटीचे
बँकेकडे रिझर्व्ह फंड आणि शेअर्स रक्कम मिळून सुमारे २,२१,८८ कोटी रुपयांची ठेव जमा आहे. बँक दरवर्षी १.७४ कोटी रुपयांच्या कर्जावर व्याज आकारत आहे. वास्तविक पाहता सभासदांचे ९६ लाख इतकेच कर्ज थकीत आहे.
याच कर्जावर बँकेकडून व्याज आकारण्यात यावे,
अशी विनंती चेअरमन भोसले यांनी मुख्यमंत्री यांना केली आहे.
याचवेळी सोसायटीचा रिझर्व्ह फंड आणि शेअर्स
रक्कम जी बँकेकडे जमा आहे, त्या २,२१,८८ कोटी रुपयांमधून सोसायटीला कर्जवाटपासाठी रक्कम उपलब्ध करून देण्यात यावी, याबाबतचे आदेश जिल्हा मध्यवर्ती बँकेला मुख्यमंत्र्यांनी करावेत , अशी विनंती त्यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
वास्तविक पाहता थकीत सभासदांच्या वसुलीबाबत सोसायटीने त्याच्यावर १०१ ची कारवाई करून वसुली दाखले बँकेकडे दिले आहेत. परंतु बँकेने कोणतीही कारवाई आजपर्यंत या सभासदांवर केलेली नाही. परिणामी या थकीत कर्जामुळे, बँकेची सोसायटीकडे थकबाकी वाढून ती १.७४ कोटी रुपयांवर गेली आहे. बँक दरवर्षी याच रकमेवर व्याज आकारत आहे.
सोसायटीचे मेंबर कर्ज फक्त ९६ लाख रुपये आहे. या तफावतीमुळे बँक आर्थिक आरिस्टात सापडली आहे. यापुढील काळात तरी बँकेने सोसायटी संदर्भात सहकार्याची भूमिका घ्यावी,अशी विनंती भोसले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.