ईतर

विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून ७७ हजार रुपये किमतीचे चांदीचे टाळ अर्पण

मंदिर समितीकडून भाविकाचा सन्मान

पंढरपूर (प्रतिनिधी)

आषाढी यात्रा जवळ येईल तसतसा भाविकांचा वाढतच चालला आहे. विठुराया प्रति असलेल्या भाविकांच्या श्रद्धेला धुमारे फुटत आहेत. शुक्रवारी
पुण्यातील एका भाविकांने विठ्ठल रुक्मिणी मातेस चांदीचे टाळ अर्पण केले. या काळाची किंमत ७७ हजार रुपये इतकी असून, भाविकांच्या श्रद्धेला मोल नसते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

हडपसर, पुणे येथील भाविक कमलेश अशोक मगर यांनी श्री विठ्ठल रूक्मिणीमातेस १ किलो ५५ ग्रॅम वजनाच्या चांदीचे टाळ अर्पण केले आहेत. त्याची किंमत रू.७७६४८/- इतकी आहे. यावेळी मंदिर समितीच्या वतीने सदर देणगीदार भाविकाचा सत्कार मंदिर समितीचे विभाग प्रमुख संजय कोकीळ यांच्या हस्ते, श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन करण्यात आला. यावेळी देणगीदार यांचे कुटुंब, विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी उपस्थित होते. या टाळाचा वापर श्रींच्या नित्य उपचारावेळी भजन म्हणताना करण्यात येणार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close