सामाजिक

यात्रेत भाविकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय

भोसे येथे समाजसेवक हनुमंत मोरे यांचा उपक्रम

पाऊस पडण्यास सुरुवात झाली असली तरीही, पारा
अजूनही खाली येण्याचे नाव घेत नाही. उन्हात नागरिकांची तगमग थांबली नाही. अशातच भोसे येथील श्री जानुबाई देवीची यात्रा शुक्रवारी पार पडत आहे. भर उन्हातनागरिकांच्या घशाची कोरड थांबवण्यासाठी, थंडगार पिण्याचे पाणी असेल तर … हो भोसे येथील या यात्रेत समाजसेवक हनुमंत मोरे
यांनी थंड पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. या थंडगार पाणपोईचे उद्घाटन
ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र कोरके पाटील यांच्या शुभहस्ते गुरुवारी पार पडले. यावेळी समाजसेवक हनुमंत मोरे यांच्यासह भोसे परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

पंढरपूर तालुक्यातील भोसे गावचे ग्रामदैवत श्री जानुबाई देवीची यात्रा
२३, २४ आणि २५ मे रोजी पार पडत आहे. या यात्रेस लाखो भाविक उपस्थिती लावत असतात. भर उन्हाळ्यात असणाऱ्या या यात्रेत दरवर्षीच शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते. समाजसेवक हनुमंत मोरे हे, हा उपक्रम दरवर्षीच राबवत असतात.
यावर्षीही थंडगार शुद्ध पिण्याच्या पाणपोईचे उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले. याप्रसंगी सुनील अडगळे (गुरुजी),
हरिचंद तळेकर, विलास जमदाडे, बाळासाहेब थिटे, राजेंद्र गायकवाड, दिलीप कोरके, नितीन व्यवहारे, अशोक जमदाडे, बाळासाहेब जाधव, संजय थिटे, किरण अडगळे, नवनाथ कोरके, शिकारे दाजी, सचिन कोरके, भैय्या जमदाडे, अशोक अवताडे, पिंटू अडगळे, हनुमंत कोळी यांच्यासह
अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

भर उन्हाळ्यात साजऱ्या होणाऱ्या या यात्रेत, भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय महत्त्वाची होती. उन्हाचे चटके बसणाऱ्या भाविकांना शुद्ध थंड पाण्याचा आस्वाद या पाणपोईच्या माध्यमातून घेता येणार आहे , हनुमंत मोरे यांनी राबवलेला हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र कोरके यांनी यावेळी व्यक्त केले.

हनुमंत मोरे हे अनेक वर्षापासून समाजसेवक म्हणून कार्यरत आहेत. मागील काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिल्याने ते चर्चेत आले होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close