
टी २० विश्वविजेती इंडियाची टीम बारबाडोस
शहरातच अडकली आहे. या शहरास चक्रीवादळ धडकले असून त्या ठिकाणी संचारबंदी सदृश्य
परिस्थिती निर्माण झाली आहे. बीबीसी कडून आता विशेष विमान त्यांच्यासाठी पाठवले जाणार आहे.
टीम टी २० इंडियाने विश्वचषक पटकावला. हा अंतिम सामना वेस्टइंडीज मधील बारबाडोस येथील खेळपट्टीवर झाला होता. विश्वचषक जिंकल्याचा आनंद खेळाडूंना मावत नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या टीमचे फोन करून कौतुक केले. यानंतर ही टीम माघारी फिरणार होती परंतु अचानक त्या शहरात चक्रीवादळ झाले. तेथील परिस्थिती हाताबाहेर गेली. या ठिकाणी कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी सरकारने नाकारली आहे. याचवेळी टीम इंडियाची ही एका हॉटेलमध्ये अडकून पडली आहे. चक्रीवादळामुळे तेथील विमानसेवा बंद ठेवण्यात आली आहे.
त्यांच्या विमानाचे उड्डाण अचानक रद्द झाल्यामुळे टीम इंडियाला हॉटेलमध्येच मुक्काम करावा लागला आहे. ही परिस्थिती निवळताच, टीम इंडिया तिथून निघणार आहे.