राजकिय

कहो दिलसे .. काँग्रेस फिरसे …

पंढरीतील मुस्लिम बांधव काँग्रेसवर मेहरबान

सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आ. प्रणिती शिंदे आणि महायुतीच्या उमेदवारामध्ये
रंगतदार सामना होण्याची चिन्हे आहेत. या धर्तीवर
या मतदारसंघात असणाऱ्या पावणे चार लाख मुस्लिम बांधवांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.मागील काही दिवसांपूर्वी सोलापूर आणि पंढरपूर येथील मुस्लिम बांधवांमध्ये
महाविकास आघाडीच्या उमेदवाराविषयी नाराजी पसरली होती. परंतु ती नाराजी आता दूर झाली आहे. मुस्लिम बांधव कदापिही काँग्रेसपासून दूर जाणार नाहीत, असा विचार काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष अशपाक सय्यद यांनी बोलून दाखवलl आहे.

 

मुस्लिम बांधवांची समजूत काढण्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी पंढरीत आले होते. या ठिकाणच्या दर्ग्यात जाऊन त्यांनी
चादर चढवली. येथील मुस्लिम बांधवांसोबत चर्चा केली. पंढरपूर शहरातील
३४ हजार मुस्लिम बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांचे आणि मुस्लिम बांधवांचे नाते यामुळे आणखी घट्ट झाले.
याकामी पंढरपूरमधील काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष अशपाक सय्यद यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

 

यावेळी येथे उपस्थित असलेल्या मुस्लिम बांधवांनी एकही मत महायुतीच्या उमेदवाराला जाणार नाही, याची सुशीलकुमार शिंदे यांना हमी दिली. मुस्लिम बांधव कायमच काँग्रेस पक्षाशी
जोडले गेले आहेत. समाजातील एकही मत
विरोधी उमेदवाराला जाणार नाही, याची खात्री
अशपाक सय्यद यांनी सुशीलकुमार शिंदे यांना दिली.

 

मागील काही दिवसांपूर्वीच
सोलापूर येथे मुस्लिम बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसही अशपाक सय्यद, पंढरपूरचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close