क्राइम

एलसीपीचा खाकीला दणका

पन्नास हजाराची लाच घेताना पोलिसाला रंगेहात पकडले

मोटारसायकल गुन्ह्यात तक्रारदार याचे नाव न येऊ देण्याकामी, पन्नास हजारांची लाच घेताना,
पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक रंगेहात सापडल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. याप्रकरणी त्या पोलीस कर्मचाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वैजीनाथ संदीपान कुंभार (वय ५८) पोलीस नाईक,
नेमणूक पंढरपूर शहर पोलिस ठाणे, रा. पुजारी सिटी, इसबावी (पंढरपूर) असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात भा.द.वी. १८६० चे कलम २७९, ३३७, ३३८ व मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १३४(ए),१३४(बी), १७७, १८४ प्रमाणे अज्ञात वाहनाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार यांची मोटर सायकल न दाखवण्यासाठी, तसेच सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी, यातील लोकसेवक वैजीनाथ संदिपान कुंभार यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले, आणि सदरची रक्कम लाच म्हणून स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

पंढरपूर तालुक्यात महावितरण कंपनी, महसूल प्रशासन यामधील अधिकाऱ्यांवर या वर्षात अनेक कारवाया झाल्या आहेत. आता खाकीलाच
धक्का देण्याचे काम, लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे. यामुळे पंढरपूर तालुक्यातील सर्वच प्रशासनात खळबळ उडाली आहे.

सदरची यशस्वी सापळा कारवाई सोलापूर विभागातील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार, पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल घाडगे, सलीम मुल्ला, पोलीस नाईक स्वामीराव जाधव, चालक श्याम सुरवसे यांच्या पथकाने यशस्वी पार पाडली.

राज्यातील पोलीस विभागाची प्रतिमा अगोदरच मलीन झाली आहे. खोटे नाठे गुन्हे दाखल करणे, गुन्ह्यात अडकलेल्या नागरिकांना नाहक त्रास देणे, अवैध धंदे करणाऱ्यांच्या पाठीशी राहून त्यांना अभय देणे, अशा प्रकारच्या कामांमुळे पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे. आता पंढरपूर शहरात घडलेल्या
पोलिसावरील कारवाईवरून ही खाकी पुन्हा डागाळल्याचे दिसून येत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close