
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नकली सेना आणि बाळासाहेबांची नकली संतान अशी जाहीर प्रचारसभेतून टीका करण्यात आली होती. यावर ठाकरेंकडून प्रत्यु्त्तर देताना मोदींना बेअकली माणसा, असा पलटवार करण्यात आला. प्रचाराच्या या खालावलेल्या भाषेवर आता आमदार बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.”कुणालाही नकली संतान म्हणणे योग्य नाही, म्हणत कडूंनी पंतप्रधान मोदींवर टीकेचा प्रहार केला आहे.
एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, “मला वाटतं एवढ्या मोठ्या नेत्यांनी अशा प्रकारची भाषा वापरु नये. कुणीही असो अशी व्यक्तिगत टीका कुणीही कुणावर करु नये. नकली पक्षांपर्यंत टीक आहे. पण नकली संतान अशी विधानं मोदी करतील असं वाटत नाही, पण बोलले असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे. खालच्या स्तरावर हा प्रचार जाईलच. दुर्देव आहे, ग्रामपंचायतीत अशा प्रकारची भाषा वापरली गेली नाही.”
मोदी नेमके काय म्हणाले?
मी जरा नकली शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंच्या संतानांना विचारायचं आहे. जरा बाळासाहेबांचं स्मरण करा. मी नकली संतानांना विचारु इच्छितो. मी त्यांचे मार्गदर्शक बुजुर्ग नेत्यांनाही विचारु इच्छितो. यांनी म्हंटलं की, पश्चिम भारताचे लोक अरब राष्ट्रांचे वाटतात. महाराष्ट्राच्या लोकांना ही भाषा मान्य आहे का? असा सवाल पंतप्रधान मोदींनी विचारला.
पंतप्रधान मोदी १७ तारखेला मुंबईत येत आहेत. शिवाजी पार्कला येतील. बाळासाहेबांच्या स्मारकावरती जातील. नाक रगडतील. मंचावर बाळासाहेबांची आठवण काढून ढसाढसा रडतील. ही नकली आणि बेअकली माणसं आहेत. मी उघड बोलतो. कारण मला जर नकली संतान म्हणत असाल, तर तुम्हीसुद्धा नकली आणि बेअकली आहात, असे उद्धव ठाकरे
यांनी यावर पलटवार केला आहे.