सामाजिक

पंढरपूर नगरपरिषदेकडून नागरिकांना नाहक भुर्दंड

पंढ आम आदमी झाडू संघटना उठवणार आवाज

महावितरण वीज कंपनीकडून विजेचे दर वाढवले गेले आहेत. घराघरात वीज जपून वापरली जात आहे.
पंढरपूर नगरपरिषदेने
मात्र याबाबतीत हद्दच केली आहे. पंढरपूर शहरात गेल्या दीड महिन्यांपासून दिवसाही विजेचा प्रकाश पाडला जात आहे. विद्युत खांबांवरील विज लाईट भर दिवसाही सुरूच आहे,
या प्रकाराने सर्वसामान्य नागरिक अचंभीत झाले आहेत, तर मुत्सद्दी नागरिकांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आहे. पंढरपूर नगरपरिषदेच्या या कामाचा मोठा निषेध होत आहे.

आम आदमी पार्टी झाडू संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड.
नागेश पवार यांनी ही घटना उजेडात आणली आहे. यावर आपण आंदोलनही करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात घरगुती गॅससह विजेचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे वीज जपून वापरावी लागत आहे. पंढरपूर नगरपरिषदेवर
प्रशासकीय राजवट आहे. प्रशासकीय राजवट आल्यापासून पंढरीतील कारभार रामभरोसे झाला आहे. याचाच प्रत्यय गेल्या दीड महिन्यापासून येत आहे. पंढरपूर शहरात उभ्या असलेल्या वीज खांबावरील रोडलाईट भर दिवसाही सुरू आहे. याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. पंढरपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना या गोष्टीचे कोणतेही सोयर सुतक नसल्याची भावना ,त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत आम आदमी झाडू संघटनेचे जिल्हाध्यक्ष नागेश पवार यांनी आवाज उठवला आहे.

पंढरपूर शहरातील नागरिकांना पंढरपूर नगरपरिषदेकडून नाहक भूर्दंड सोसावं लागत आहे. दिवसा रोडलाईट सुरू ठेवून याचे बिल नागरिकांच्या माथी मारले जात आहे. याचा परिणाम पंढरपूर नगर परिषदेकडून भरमसाठ करवाढ नागरिकांवर लादली जात आहे. हे आपण उघड्या डोळ्यांनी बघणार नाही. यावर नक्कीच आंदोलन छेडणार असल्याची प्रतिक्रिया, आम आदमी झाडू संघटनेचे जिल्हाध्यक्ष
नागेश पवार यांनी दिली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close