
संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडी याला यांना राज्यात किती जागा मिळणार याचे अंदाज बांधले जात आहेत. या आकडेवारीवरून सध्या पैजाही लागल्या आहेत.
महाविकास आघाडीतील कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीला राज्यात किती जागा मिळणार ? हा आकडाच सांगून टाकल्याने
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिक येथील पत्रकार परिषदेत बोलताना आमदार रोहित पवार यांनी राज्यातील राजकारणाचा ताजा आलेख मांडला. अहमदनगर नंतर आता नाशिक येथे महायुतीची नेतेमंडळी पैसे वाटपात गुंग आहेत. राज्यात २ हजार कोटी रुपये महायुतीने लोकसभा निवडणुकीसाठी लावले आहेत. एकट्या बारामतीत दीडशे कोटी रुपये वाटण्यात आले. शिवसेनेचे जेष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री
नाशिकमध्ये आले असता सोबत त्यांनी पैशाची बॅग आणली असल्याचा आरोप केला होता.
महायुती आणि मित्र पक्षांना एकूण १६ जागा मिळतील असा विश्वास आ. रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. भाजपाकडून राज्यात झालेले फोडाफोडीचे राजकारण भाजपाच्या कार्यकर्त्यांना पटलेले नाही.
यामुळेच त्यांनी मतदान केंद्रांकडे पाठ फिरवली.
याचा फायदा महाविकास आघाडीला झाला असून,
राज्यात भाजपाला १३ ते १५ जागा, शिवसेना शिंदे गटाला २ जागा, अजित पवार गटाला एकही जागा नाही, या पद्धतीने महायुतीला १६ जागा मिळतील असा विश्वास आ.रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीच्या या नेत्याने केलेल्या दाव्यामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.