
दुग्धविकास आणि पशुसंवर्धन खात्याच्या सचिव पदावरून, तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. असंघटित कामगार खात्याच्या विकास आयुक्त पदावर त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी मुंडे यांना बदलीचे पत्र दिले आहे. त्यांच्या पदाचा कार्यभार राजेश कुमार यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. दुग्ध विकास विभागाकडे त्यांची नेमणूक होताच, राज्यातील दूध भेसळ थांबणार, असे
सर्वांनाच वाटले होते परंतु तसे होताना दिसले नाही.