मुंबई (प्रतिनिधी)
लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून, खा. राहुल गांधी यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी. वेणुगोपाल यांनी केली आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत हा निर्णय झाला असून, लोकसभेत ते विरोधकाची भूमिका भक्कमपणे मांडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला २४० हून अधिक जागा मिळाल्या. यामुळे इंडिया आघाडी लोकसभेत भक्कमपणे पुढे आली. मागील दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला कमी जागा मिळाल्या होत्या. यामुळे विरोधकांतून विरोधी पक्ष नेते पद निवडले गेले नव्हते. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीने या लोकसभा निवडणुकीत शानदार कामगिरी बजावली.आता लोकसभेचे विरोधी पक्ष नेतेपद राहुल गांधी हेच भूषवणार आहेत. विरोधकांची भूमिका ठामपणे मांडणार आहेत. इंडिया आघाडीची बैठक
नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.