
मुंबई:
भारतीय टी २० विश्वचषक विजेता संघ गुरुवारी भारतात परतला. २९ जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या शर्यतीत दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत भारताने १७ वर्षानंतर २३ व्या विश्वचषकाचे विजेते पद पटकावले. या विजयानंतर भारतीय संघ वादळामुळे काही दिवस बारबाडोस मध्येच अडकला होता. सचिव जय शहा यांच्या उत्तम प्रयत्नांमुळे, भारतीय संघ चार्टर्ड फ्लॅटद्वारे गुरुवारी दिल्लीत परतला. टीम इंडियाचे मोठ्या उत्साहात करण्यात आले. त्यानंतर भारतीय संघाचे वेळापत्रक निश्चित झाले. प्रथम संघाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर रोहित शर्मा आणि संपूर्ण संघ मुंबईला रवाना होणार आहे. सायंकाळी पाच वाजल्यापासून मुंबईत रोड शो होणार असून, त्यानंतर मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर हा संघ विजयाचा जल्लोष करणार आहे. तिथेच त्यांना सन्मानितही करण्यात येणार आहे.
*टीम इंडिया मुंबईला रवाना*
भारतीय क्रिकेट संघ मुंबईला जाण्यासाठी, दिल्ली विमानतळावर रवाना झाला. मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंतचे आयोजन करण्यात आले आहे. टीम इंडियाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन, त्यांच्या सोबत नाश्ता केला.