राजकिय

महिलांवरील अत्याचार रोखण्यात राज्य सरकार अपयशी

पंढरीचा महाविकास आघाडी कडून महायुती सरकारचा निषेध

पंढरपूर (प्रतिनिधी)

बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर
अत्याचार करण्यात आला.या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी कडून राज्यभर आंदोलने करण्यात येत आहेत. शनिवारी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती, परंतु या बंदला मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंदची हाक मागे घेतली होती. शनिवारी राज्यभर काळ्या फिती लावून, महायुती सरकारचा जोरदार निषेध नोंदवण्यात आला.

पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात
महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षातील नेते एकत्र आले. गेल्या आठ दिवसात महिलांवर अत्याचाराच्या बारा घटना राज्यात घडल्या आहेत.
राज्याचा गृहविभाग मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका, उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे यांनी केली. यावेळी माढा विभाग प्रमुख साईनाथ भाऊ अभंगराव, राष्ट्रवादीचे नेते सुभाष भोसले, काँग्रेसचे अमर सूर्यवंशी, माजी नगरसेवक
किरण घाडगे यांनीही महायुती सरकारवर तोफा डागल्या. काळ्या किती लावून, सर्वांनी महायुती सरकारचा जोरदार निषेध केला. सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.

पंढरपूर शहरात करण्यात आलेल्या या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव, तालुका प्रमुख बंडू घोडके, शहर प्रमुख रवी मुळे, सिद्धेश्वर कोरे, काका बुरांडे, तानाजी मोरे, विनय वनारे, सचिन बंदपट्टे, नागेश रितुंड, संजय घोडके, उत्तम कराळे, अर्जुन भोसले, हनुमंत भोसले, रणजीत कदम, कल्याण कदम, अनिल रोंगे, दिलीप दुधाडे, अनिल कांबळे, विजय बागल, ॲड. पुनम अभंगराव, संगीता पवार, पूर्वा पांढरे, मंजुळा धोडभिसे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close