पंढरपूर (प्रतिनिधी)
मी संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सतत बोलत आहे. सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु शेतकऱ्यांच्या अडचणी संपतील अशी परिस्थिती नाही, राज्यातील सरकार बदलल्याशिवाय शेतकऱ्यांच्या अडचणी संपणार नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्या पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या बळीराजा शेतकरी संघटनेच्या २ ऱ्या
वर्धापनदिन सोहळ्याप्रसंगी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार शिरोमणी साखर
कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे हे होते.
या कार्यक्रमात समाजातील उत्कृष्ट काम करणाऱ्या
गुणवंतांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
खा.प्रणिती शिंदे यांनी या पुरस्कार प्राप्त मंडळींचे कौतुक केले. बळीराजा शेतकरी संघटनेच्या कामाबद्दल कौतुक करीत त्यांना पाठीशी राहण्याचे आवाहनही केले.
बळीराजा शेतकरी संघटनेचा वर्धापन दिन सोहळा पंढरपूरमधील हॉटेल विठ्ठल इन मध्ये पार पडला. या सोहळ्यामध्ये भगीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नागेश फाटे, शेतकरी संघटनेचे समाधान फाटे, माजी जि.प.सदस्य शिवाजीराजे कांबळे, भारतनाना पाटील, पंढरपूर ता.काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंत मोरे, बळीराजाचे संस्थापक अध्यक्ष नितीन बागल, संस्थापक सचिव रामदास खराडे, राज्य सचिव रमेश गणगे, याशिवाय परंडा तालुक्यातील तसेच धाराशिव जिल्ह्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी विविध मान्यवरांच्या शुभहस्ते
पुरस्कार प्राप्त मंडळींचा सन्मान करण्यात आला.
या ठिकाणी देण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये आदर्श शिक्षिका वैशाली दांडगे बिबवेवाडी,पुणे, आंतरराष्ट्रीय आदर्श शिक्षिका वर्षा भोगे (राजापूर,नाशिक), विकासराजे खराडे(राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार),रेश्मा नौशाद शेख (सामाजिक रत्न) ,अंजली प्रमोद बिहाडे(आदर्श समाज रत्न,पंढरपूर), सुवर्णा पवार, इचलकरंजी (आहील्यादेवी होळकर पुरस्कार),आशा कराळे,इचलकरंजी(आदर्श प्राध्यापक),डॉ.वृषाली गडाख, न्युरोसर्जन डोंबिवली,कल्याण (भारतरत्न पुरस्कार),सुरेखा पाटील चिखलकर ,वाळवा( सामाजिक व साहित्यिक पुरस्कार),मेघा उळागड्डे, नांदणी( आदर्श साहित्यिक),कुमुदिनी कोरे,माळीनगर(आदर्श कर्मचारी), उज्वला पाटील,इचलकरंजी(आदर्श मुख्याध्यापक),अरुची पाटील,नाशिक, रेखा जाधव,पाटण (आहिल्यादेवी होळकर ), शिल्पा विभुते,उ.सोलापूर(कृषिरत्न),कविता जगताप,निफाड(अंगणवाडी सेविका),सुनीता पडवळ(साहित्यरत्न), सिद्धनाथ सावंत (उत्कृष्ट रिपोर्टर), निरंजन ठणठणकर वाशिम(साहित्यरत्न), तनुजा फाटे पंढरपूर (आदर्श गुणवत्ता), मनीषा नागणे पंढरपूर (आदर्श शिक्षिका), तृप्ती कळसे पुणे, (साहित्यरत्न), संगीता माने सातारा (महाराष्ट्र भूषण), माया भंडारे इचलकरंजी (आदर्श महिला), हर्षदा एरे ठाणे,(आदर्श महिला), अनन्या लोखंडे पंढरपूर (गुणवंत विद्यार्थी), मयुरी बागल पंढरपूर (गुणवंत विद्यार्थी), जयश्री पवार संभाजीनगर ( आदर्श शिक्षिका),नितीन इंगळे यावल(सामाजिक रत्न), संगीता इंगळे (डॉ.आंबेडकर सामाजिक रत्न),पूजा सानप( साहित्यिक), अश्विनी सांगळे (नारीशक्ती सन्मान), प्रतिभा निकुंभ नाशिक(आदर्श शिक्षिका) गायत्री मेणसे सोलापूर (डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक रत्न), सविता पाटील जुळे सोलापूर (साहित्यिक ), उज्वला कोल्हे कोपरगाव (महाराष्ट्र भूषण) इत्यादी पुरस्कारांचा समावेश होता.