
- पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर येथील अंजली बिहाडे पाटील यांना नुकतेच राज्यस्तरीय सामाजिक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बळीराजा शेतकरी संघटनेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
याप्रसंगी सरकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, बळीराजा संघटनेचे संस्थापक नितीन बागल, संस्थापक सचिव लोकनेते रामदास खराडे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
येवला पैठणी, विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती, २० इंची सन्मान चिन्ह, शाल आणि फेटा देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. पंढरपूर तीर्थक्षेत्रात चंद्रभागा नदीच्या वाळवंटात गरिबांना मोफत जेवण पुरविण्याचे काम अंजली बिहाडे पाटील या मागील अनेक वर्षापासून करत आहेत. याच कार्याची दखल बळीराजा संघटनेकडून घेण्यात आली. आणि त्यांना सामाजिक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पंढरपूर येथील जुन्या बसस्थानकासमोरील हॉटेल विठ्ठल इन मध्ये रविवार दि. २५ ऑगस्ट रोजी मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक पुरस्कार प्राप्त मंडळी आणि त्यांचे साथीदार आवर्जून उपस्थित होते.बळीराजा शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरही याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.