“डॉ.निकम यांच्या ट्युलिप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये शासकीय आरोग्य योजनेची सुरुवात
रविवारी होणार दिमाखदार सोहळा

पंढरपूर ( प्रतिनिधी)
पंढरपूर येथील सुप्रसिद्ध डॉ.निकम यांचे ट्यूलिप सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना या योजनेच्या उद्घाटना निमित्त मोफत सर्व रोग आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे. दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी डॉ. निकम यांचे ट्यूलिप सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल के बी पी कॉलेज चौक या ठिकाणी सर्व रोग आरोग्य शिबिर मोफत आयोजित केले आहे. सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत या ठिकाणी सर्व रोग आरोग्य शिबिर मध्ये मोफत तपासणी केली जाणार आहे. याचा लाभ पंढरपूर शहर तसेच पंढरपूर तालुक्यातील व अन्य तालुक्यातील नागरिकांनी घ्यावा. असे आवाहन डॉ. निकम यांनी केले आहे.
या ठिकाणी सर्व रोग तपासणी ही तज्ञ डॉक्टरांच्या देखरेख खाली होणार असून यावेळी सी बी सी तपासणी मोफत केली जाणार आहे. ही सी बी सी तपासणी मध्ये रुग्णांना चक्कर येत असेल अशक्तपणा, ताप येणे याची तपासणी होणार आहे. त्याचप्रमाणे मोफत रक्तातील साखरेचे तपासणी होणार आहे. या रोगामध्ये डोळ्याला कमी दिसणे, चक्कर येणे, हातपाय दुखणे आधी आजाराची लक्षणे असतात. त्यासाठी ही उपचार यंत्रणा कामी येते. अशी माहिती डॉक्टर निकम यांनी दिली.