
पंढरपूर (प्रतिनिधी)
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून , ते वेगवेगळ्या मार्गांनी चर्चेत आले आहे. निकाल लागताच या निकालावरच संशय व्यक्त करण्यात आला. सरकार स्थापनेसही उशीर झाला.
पुन्हा मंत्री मंडळ विस्तार रखडला. याबाबत विविध
प्रकारे टीका करण्यात आल्या. काँग्रेसचे प्रवक्ते माजी आमदार अनंत गाडगीळ , यांनी या सरकारचा कारभार म्हणजे आठवडा बाजार असल्याचे म्हटले आहे. या सरकारबाबत बोलताना त्यांनी पुढीलप्रमाणे टिप्पणी केली आहे.
निवडणुकीचे निकाल लागून महिना झाला. सरकार बनवायला आठवडा लावला, मुख्यमंत्री निवडायला आठवडा, मंत्र्यांच्या शपथविधीला आठवडा, खातेवाटपाला आठवडा, मंत्र्यांना बंगले द्यायला आठवडा. आणी आता दर आठवड्याला वाढणारी आमदारांची नाराजी घालवायला किती आठवडे लागणार , असा सवालही गाडगीळ यांनी केला आहे. यावरून महायुतीचा कारभार म्हणजे “आठवडा बाजार” असल्याचे सिद्ध होते अशी उपरोधक टिका कॅांग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी आज केली आहे.