ईतर

तुळजाभवानीचं दर्शन आता बावीस तास राहणार खुले

प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश

पंढरपूर (प्रतिनिधी)

नाताळच्या सुट्ट्या, नवीन वर्ष तसेच लग्नसराईमुळे तुळजाभवानी मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे आजपासून पुढील आठ दिवस म्हणजेच एक डिसेंबर पर्यंत मंदिर २२ तास खुले ठेवण्याचा निर्णय प्रशासनाला घेतला आहे. २५ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत मंदिर पहाटे एक वाजता चरणतीर्थ पूजा होऊन भविकासाठी खुले करण्यात येणार, तर रात्री साडेदहाच्या सुमारास प्रक्षाळ पूजेनंतर मंदिर बंद करण्यात येणार आहे. मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तहसीलदार माया माने यांनी तसे आदेश काढले आहेत.

नाताळ, नवीन वर्ष, आणि लग्नसराईमुळे मोठ्या प्रमाणावर लोक तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येतात. राज्यासह परराज्यातूनही तुळजाभवानीच्या चरणी आशिर्वाद घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्यसाठी भाविकांची गर्दी झाल्याचं दिसत आहे तशी परंपराही आहे. त्यामुळे मंदिर परिसरात सध्या भक्तांची विशेष गर्दी होत आहे.

मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तहसीलदार माया माने यांनी हा निर्णय घेतल्याचे अधिकृत आदेश काढले आहेत. गर्दीचे नियोजन आणि भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी प्रशासन सज्ज आहे. भाविकांना सुव्यवस्थित दर्शनाची सुविधा देण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी, स्वयंसेवक, आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत.

*नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी*

२५ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ या कालावधीत, मंदिर २२ तास खुले ठेवण्यात येणार आहे. पहाटे १ वाजता चरणतीर्थ पूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येईल, तर रात्री साडेदहा वाजता प्रक्षाळ पूजा होऊन मंदिर बंद केले जाईल. या काळात भाविकांना देवीचे दर्शन अधिक सुलभपणे घेता यावे यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

*तुळजापूर भाविकांनी गजबजले*

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.एकीकडे नाताळ सण तर दुसरीकडे लग्नसराईमुळे राज्यासह तेलंगना, कर्नाटकसह राज्यभरातुन भाविक दाखल झाले आहेत .तुळजाभवानी मातेचा कुलधर्म , कुलाचार, जागर गोंधळ, अभिषेक, पुजा करण्यासाठी भाविक येत असतात . त्यामुळे तुळजाई नगरी भाविकांनी गजबजून गेली आहे . मंदिर परिसर आणि तुळजाई नगरी भाविकांनी गजबजलेली आहे.देवीच्या दर्शनासाठी तासनतास रांगा लावल्या आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close