
कुटुंबाच्या सुखदुःखात माणूस किती वाहून जातो , त्याला सुखाचे क्षणही अनुभवता येत नाहीत. अखेर यातूनही तो मोकळा होतो, आणि एखादा सुखाचा क्षण अनुभवतो. पंढरपूर तालुक्यातील भोसे गावचा युवक हरिचंद्र तळेकर यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला. हा क्षण अनुभवण्यास त्यांना २० वर्षाचा कालावधी लागला. तब्बल २० वर्षानंतर साजरा करण्यात आलेला हा क्षण मात्र धुमधडाक्यात साजरा झाला.
जीवन म्हणजे सुखदुःखांची मालिका असते. यात प्रत्येक जण आपल्या कार्यक्षमतेप्रमाणे जगत असतो. दुःखाला क्षणात पाठीशी टाकून , आनंदाचे क्षण अनुभवणारे काही मोजकेच लोक असतात. परंतु कुटुंबातील दुःखास कवठाळून आनंदाचे क्षण सोडून देणारे , काही भावुक लोकही आपले जीवन समर्थपणे जगताना दिसतात.
तब्बल २० वर्षे लग्नाचा वाढदिवस साजरा करू न शकणारे, हरिश्चंद्र तळेकर हे त्यापैकीच एक.
वीस डिसेंबर २०२४ हा दिवस त्यांच्यासाठी मोठा आनंदाचा होता. या दिवशी त्यांनी लग्नाचा विसावा वाढदिवस साजरा केला. आपल्या जीवनातील सवंगड्यांना या क्षणासाठी आमंत्रित केले. स्वतःची पत्नी , १५ वर्षाचा मुलगा, १७ वर्षाची मुलगी हेही या आनंदात सामील झाले होते. तब्बल वीस वर्षांनी लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यामागे त्यांची दीड तप तपश्चर्या होती.
तळेकर यांचे पिता कै. देवचंद काशिनाथ तळेकर हे गावातील बडे प्रस्थ होते. काही वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघात झाला. यानंतर ते एकाच ठिकाणी बसून राहिले. त्यांची देखभाल आणि सेवा करण्याचे भाग्य हरिचंद्र तळेकर यांना लाभले. आई राहीबाई, भाऊ विक्रम आणि सुधीर यांच्या खांद्यावरही ही जबाबदारी पडली. त्यांनीही सर्व शक्ती पणाला लावत प्रपंचाचा गाडा हाकण्याचे मोठे काम पार पाडले. कर्तव्याप्रती तत्पर असणाऱ्या हरिचंद्र तळेकर यांनी हे व्रत मनोभावे जपले. हे व्रत सुरू असतानाच , दीड वर्षांपूर्वी देवचंद तळेकर हे पडद्याआड झाले. वडिलांच्या सेवेतून हरिचंद्र तळेकर यांची निवृत्ती झाली. तोपर्यंत मुले मोठी झाली होती. मुलगा हायस्कूलला तर मुलगी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊ लागली होती. मुलांचे शिक्षण आणि वडिलांची सेवा करण्यात ,
हरिचंद्र तळेकर आणि त्यांची पत्नी अनिता यांना वीस वर्षाचा कालावधी कधी लोटला ,याची जाणीवही झाली नाही.
या ओघातच २० डिसेंबर २०२४ हा दिवस उजाडला. तब्बल २० वर्षांनी का होईना ? हरिचंद्र तळेकर यांनी हा दिवस मोठा आनंदात साजरा केला. हरिचंद्र तळेकर यांच्या जीवनाचा हा
पट संत पुंडलिकापेक्षा वेगळा नाही. आधुनिक युगातही हरिचंद्र तळेकर यांच्यासारखे संत पुंडलिक जीवन जगत आहेत, याची खात्री , या प्रसंगातून आल्याशिवाय राहत नाही.
हरिश्चंद्र तळेकर हे व्यक्तिमत्व भोसे परिसरात सर्वांच्या ओळखीचे आहे. लहान असो वा मोठा प्रत्येकाशी अगदी मनमोकळेपणाने संवाद करून,
त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजकारण आणि समाजकारणातही वेगळा ठसा उमटवला आहे.
एकत्र कुटुंब पद्धती , आजारी वडिलांची सेवा , मुलांचे शिक्षण यात जीवनातील २० वर्षे केव्हा निघून गेली , याचा थांगपत्ताही लागला नाही. पिताश्रींच्या मृत्यूनंतर मात्र या दाम्पत्यास
जीवनातील आनंदी क्षण खूनवू लागले. दीड तप पिताश्रींच्या सेवेत घालवलेल्या , भोसे येथील
तळेकर दांपत्याने आपल्या लग्नाचा विसावा वाढदिवस साजरा केला. बरोबरीस आलेली मुले आणि सवंगडी गोळा झाले. लग्नाचा वाढदिवस कोणत्या धुमधडाक्यात साजरा झाला.