ईतर

चालते रहा ! वार्धक्य टाळा …

शरीररुपी इमारतीचे खांब मजबूत ठेवा

मानव जसजसे आयुष्य घालवतो, तसं तसा रोज म्हातारा होत असतो, म्हणून पाय नेहमी सक्रिय आणि मजबूत असले पाहिजेत. आपण जसजसे म्हातारे होत असतो, वृद्ध होत असतो, तसतसे केस राखाडी होण्याची, त्वचा निस्तेज आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडत असतात. मात्र याची भीती बाळगू नये.

कृपया दररोज चालत जा. जर फक्त २ आठवडे पाय हलवले नाही तर पायाची खरी ताकद १० वर्षांनी कमी होते. म्हणून फक्त चालत रहा. पायांचे स्नायू कमकुवत झाल्यामुळे, नंतर पुनर्वसन व कितीही व्यायाम केले, तरीही ते बरे होण्यास बराच वेळ लागतो. म्हणून
चालण्यासारखा नियमित व्यायाम खूप महत्त्वाचा आहे.

 

आपले २ पाय हे १ प्रकारचे खांब आहेत, जे मानवी शरीराचे संपूर्ण भार सहन करतात.मजेची गोष्ट म्हणजे, माणसाच्या ५०% हाडे, ५०% स्नायू २ पायांत असतात. मानवी शरीरातील सर्वात मोठे व मजबूत सांधे, हाडेदेखील पायांमध्ये असतात.
मजबूत हाडे, मजबूत स्नायू, लवचिक सांधे लोह त्रिकोण बनवतात, जो सर्वात महत्वाचा भार वाहतो, म्हणजेच मानवी शरीर” ७०% मानवी क्रियाकलाप व व्यक्तीच्या जीवनातील ऊर्जा बर्न दोन पायांनी केली जाते.

पाय हे शरीराच्या हालचालींची मुख्य केंद्र आहे दोन्ही पायांना मिळून मानवी शरीराच्या ५०% नसा, ५०% रक्तवाहिन्या आणि ५०% रक्त त्यामधून वाहत असते.हे शरीराला जोडणारे सर्वात मोठे रक्ताभिसरण नेटवर्क आहे. म्हणून रोज चाला. फक्त जेव्हा पाय निरोगी असतात तेव्हाच रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो, त्यामुळे ज्यांच्या पायाचे स्नायू मजबूत असतात त्यांचे हृदय नक्कीच मजबूत असते.

वृद्धत्व पायांपासून वरच्या दिशेने सुरू होते… एखादी व्यक्ती वृध्द होते तेव्हा मेंदू व पाय यांच्यातील सूचनांच्या प्रसारणाची अचूकता ती व्यक्ती तरुण असतानाच्या तुलनेने कमी कमी होत जाते. याशिवाय हाडांचे वंगण व कॅल्शियम कालांतराने लवकर नष्ट होते, ज्यामुळे वृद्धांना हाडे फ्रॅक्चर होण्याची अधिक समस्या सतावते. वृद्धांमध्ये हाडांचे विकार अनेक गुंतागुंत निर्माण करू शकतात. विशेषत: मेंदूच्या थ्रोम्बोसिससारखे घातक रोग. अशी वेळ आपल्यावर येऊ नये, म्हणून… फक्त चालत रहा.

पायांचा व्यायाम वयाच्या ६० वर्षानंतरही निरंतर सुरु ठेवणे आरोग्याच्या दृष्टीनेही हिताचे आहे.
पाय कालांतराने हळूहळू म्हातारे होत असले तरी पायांचा व्यायाम करणे हे आयुष्यभराचे काम आहे.
केवळ नियमितपणे पाय बळकट केल्याने पुढील वृद्धत्व टाळता येते/कमी करता येते. म्हणून ३६५ दिवस चाला. पायांना पुरेसा व्यायाम मिळावा, पायाचे स्नायू निरोगी राहतील याची खात्री करण्यासाठी कृपया रोज किमान ३०- ४० मिनिटे अवश्य चाला, आणि खऱ्या अर्थाने निरोगी राहा.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close